+91-22-20820770

शाश्वत कृषी विकासास प्रोत्सहान

जमीन,इतर उत्पादक साधनसंपत्ती व निविष्टी,ज्ञान वित्तीय सेवा,बाजारपेठा आणि मुल्यसंवर्धनाच्या व शेतीवर रोजगाराच्या संधी खात्रीशीर आणि समानतेने उपलब्ध् करुन देवून त्याव्दारे अन्नधान्याचे अल्प उत्पादकांच्या विशेषत: महिला ,मूळ रहिवाशी शेतकरी कुटूंब,पशूपालक व मच्छीमार यांच्या कृषी उत्पादकतेत आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये दुप्पटीने करण्यास चालना देणे.

उत्पादकता व उत्पादन वाढवतील ,पर्यावरण व्यवस्था राखण्यात मदत करतील ,हवामान बदल,प्रतिकुल हवामान,अवर्षण,पूर व इतर आपत्ती यांमध्ये जूळवून घेण्याची क्षमता वाढवतील आणि जमीन व मातीचा दर्जा अधिकाधिक सुधारतील अशा शाश्वत अन्न उत्पादन पध्दतींची सुनिश्चतीस चालना देणे आणि अशा लवचिक कृषि विषय प्रथांची अंमलबजावणीस प्रोत्साहन देणे.

राष्ट्रीय ,प्रादेशिक स्तरावर सुयोग्य व्यवस्थापन केलेले आणि विविधता असलेले ,बियाणे,व रोप पेढया यांच्या माध्यमातून बियाणे लागवड केलेली रोपे आणि शेतकामाचे व पाळीव प्राणी व तत्संबंधी वन्य प्रजाती याची जणूकीय संपत्तीच्या आणि संलग्न पारंपारिक ज्ञानाच्या वापरातून मिळालेल्या लाभांची न्यायपणे व समन्यायपणे विभागणी होण्याची सुनिश्चिती प्रोत्साहन देणे.

सर्व वयोगटातील लोंकासाठी उत्तम आरोग्याची सुनिश्चिती करणे आणि चांगल्या जीवनमानास चालना देणे.

माता मृत्यू दराचे प्रमाण कमी करणे

नवजात शिशू आणि 5 वर्षाच्या आतील बालक यांचे प्रतिबंध योग्य मृत्यू थांबविणे

गुणवत्तापूर्ण शिक्षण

सर्वासाठी सर्व समावेशक व समन्याय गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुनिश्चीती करणे आणि आजीव शिक्षणाच्या संधीना चालना देणे.

संबध्द व प्रभावी शिक्षणाच्या फलनिष्पत्तीसाठी सर्व मुली आणि मुलांना पुर्णपणे नि:शुल्क समन्यायी पुणवत्तापुर्ण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देण्याची सुनिश्चिती स चालना देणे.

सर्व मुली व मुले प्राथमिक शिक्षणासाठी तयार व्हावे म्हणून त्यांना दर्जेदार ,पूर्व बाल्यावस्था विकास,काळजी व प्राथमिक शिक्षण मिळत असल्याची सुनिश्चिती स चालना देणे.

सर्व महिला व पुरुषांना परवडणारे आणि दर्जेदार असे तांत्रिक ,व्यावसायिक आणि त्रिसुत्री शिक्षण समानतेने मिळत असल्याची सुनिश्चिती स चालना देणे.

रोजगार,उत्तम नोकरी,व उपक्रमशीलता यासाठी तांत्रिक व व्यावसायिक कौशल्यासह संबध्द कौशल्ये आहेत अशा युवकांच्या व प्रौढांच्या संख्येत वाढ करणे.

शिक्षणातील लैगिंक तफावत दूर करणे,आणि विकलांग व्यक्ती ,स्थानिक लोक ,दुर्बल स्थितीतील बालके यांसह दूर्बल घटकांसाठी शिक्षण व व्यावसासयिक प्रशिक्षणाच्या सर्व स्तरावर समान शिक्षण मिळत असल्याची सुनिश्चिती स चालना देणे.

सर्व युवकांनी तसेंच पुरुष आणि महिला असे दोन्ही मिळून प्रौढ व्यक्तींनी साक्षरता व संख्याकन क्षमता साध्य केल्याची सुनिश्चिती स चालना देणे. शाश्वत विकास व शाश्वत जीवनमान,मानवी हक्क,लिंग समानता,शांतता व अंहिसेच्या संस्कृतीचे प्रचालन,सार्वत्रिक नागरिकत्वाचा हक्क आणि सांस्कृतिक सहभाग यासाठी इतर गोष्टीबरोबरच शिक्षणाव्दारे ,शाश्वत विकासास प्रचालन देण्यासाठी ,सर्व नवशिक्षितांनी ज्ञान व आवश्यक कौशल्ये संपादन केल्याची सुनिश्चिती स चालना देणे.

लैगिंक समानता साध्य करणे आणि सर्व महिला व मुलींचे सक्षमीकरण करणे

सर्व ठिकाणच्या सर्व महिला व मुलींच्या बाबतीत सर्व प्रकारचे भेदभाव दूर करणे.

राजकीय,आर्थिक आणि सार्वजनिक जीवनात निर्णय घेण्याच्या सर्व स्तरावरील प्रतिनिधीत्व करण्यासाठी महिलांचा संपूर्ण व सक्रीय सहभाग आणि त्यांना समान संधी उपलब्ध करुन दिल्याबददल सुनिश्चिती स चालना देणे. महिलांचे सक्षमीकरण करण्यास चालना देण्यासाठी सहाय्यभूत तंत्रज्ञानाचा ,विशेषत: माहिती व संसूचना तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे.

सर्वासाठी पाण्याची उपलब्धता व शाश्वत व्यवस्‍थापन याची सुनिश्चिती स चालना देणे.

सर्वासाठी सार्वत्रिक व समन्यायपणे सुरक्षित आणि परवडण्याजोगे पेयजल मिळण्याचे उददीष्ट साध्य करणे सर्वासाठी पर्याप्त व समन्यायपणे आरोग्य सुविधा मिळण्याचे आणि उघडयावर शौचास बसण्याची प्रथा नष्ट करणे आणि महिला आणि मुली तसेंच दुर्बल परिस्थितीत रहाणा-या लोकांच्या गरजाकडे विशेष लक्ष देण्याचे उददीष्ट साध्य करणे .

प्रदूषण कमी करुन पाण्याचा दर्जा सुधारणे, कच-याचे ढीग काढून टाकणे आणि घातक रसायने व साहित्य यांचे प्रमाण कमीत कमी करुन प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचे प्रमाण कमी करणे तसेंच असे सांडपाणी प्रक्रीया करुन त्याचा सुरक्षित पुर्नवापर करण्याचे प्रमाण वाढवणे .

सर्व क्षेत्रातील पाणी वापरामध्ये मोठया प्रमाणात वाढ करणे आणि पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आणि पाणी टंचाईची झळ सेासणा-या लोकांच्या संख्येत मोठया प्रमाणात घट करणे.

पर्वत,वने,पाणथळ जमीन,नदया ,जलाशये व तळी यांसह पाण्याशी संबंधित असलेल्या पर्यावरण पध्दतीचे संरक्षण करणे आणि त्यांचे जतन करणे जल व स्वच्छता व्यवस्थापन सुधारणा करण्यामध्ये स्थानिक समाजाच्या सहभागासाठी सहाय्य करणे व मजबूती देणे .

सर्वासाठी परवडण्याजोगी ,खात्रीची शाश्वत व आधुनिक उर्जा यासाठीच्या प्रवेशाची सुनिश्चितीस चालना देणे.

सर्वाना परवडण्याजोगी,खात्रीशीर आणि अत्याधुनिक उर्जा सेवा मिळण्याची सुनिश्चिती स चालना देणे.

सर्वासाठी आधुनिक व शाश्वत उर्जा सेवाा पुरविण्यासाठी पायाभूत सोयीचा विस्तार करणे आणि तंत्रज्ञान अद्ययावत करण्यास प्रोत्साहन देणे.

उत्पादक रोजगार आणि प्रतिष्ठापूर्वक काम या गोष्टींना चालना देणे

उत्पादन कार्य,सुयोग्य रोजगार निर्मिती ,उपक्रमशीलता ,क्रीयाशिलता, व नवकल्पना यांना सहाय्यभूत ठरणारी विकासाभिमुख धोरणे आखण्यास चालना देणे . आणि वित्तीय सेवा पोहचविण्यासह सुक्ष्म ,लघू आणि मध्यम आकाराच्या उद्योग उपक्रमांच्या जळणघडणीस व त्यांच्या वाढीसाठी उत्तेजन देणे.

युवक व विकलांग व्यक्ती यांच्यासह सर्व महिला व पुरुष यांच्यासाठी पुर्ण वेळ व उत्पादक रोजगार व प्रतिष्ठापूर्वक कामासाठी उपलब्ध उत्तेजन देणे.

रोजगार निर्माण करणा-या व स्थानिक संस्कृती व उत्पादनास चालना देणा-या शाश्वत पर्यटनाला प्रचालन देण्यासाठी धोरणे आखण्यास चालना देणे आणि आणि धोरणांची अंमलबजावणी उत्तेजन देणे.

सर्वासाठी ,बॅकींग विमा आणि वित्तीय सेवा मिळण्यासाठी उत्तेजन देणे

पायाभूत सुविधा: ग्रामीण गृहनिर्माण

सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची व इतर योजनांची राज्यात अंमलबजावणी करण्यास मदत करणे.

हवामानातील बदल व त्यांचे दुष्परिणाम यांचा सामना करण्यासाठी तात्काळ कृती करणे .

हवामानविषयक बदलांचे सौम्यीकरण ,अनुकुलता आणि पूर्वसूचना यासंबंधातील शिक्षण,जागृतीमधील वाढ व व्यक्ती व संस्थागत क्षमता या सेवा मिळण्यासाठी उत्तेजन देणे.

स्त्रिया ,युवक व स्थानिक आणि सिमांतिक समूहांवर लक्ष केन्द्रीय करण्यासह ई प्रणाली हवामानातील बदला संबंधात नियोजन व व्यवस्थापनासाठीची क्षमता या सेवा मिळण्यासाठी उत्तेजन देणे.